मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, भाजपची राज्यपालांकडे मागणी…

0
261

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षामध्ये आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून राज्यपालांना बहुमत चाचणीसाठी पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. त्यामध्ये राज्यपालांना राज्य सरकारला बहुमत चाचणी घेण्यासाठी पत्र दिले. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यपालांना ईमेलद्वारे आणि प्रत्यक्ष पत्र दिलेले आहे. या पत्रामध्ये राज्याची जी परिस्थिती आहे. ज्या बातम्या आम्हाला पाह्यला मिळत आहेत. शिवसेनेचे ३९ आमदार गायब आहेत. शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकारमध्ये राह्याचे नाही, असे सांगत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.