भाजप हा या देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा पक्ष आहे. या विकासाच्या प्रक्रियेत ज्या ज्या लोकांनी भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली, त्या सगळ्यांना पक्षात सामावून घेण्याची भूमिका असते. त्यामुळे उद्या अजित पवारच काय शरद पवार यांनीही भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांचेही स्वागत असेल, असे वक्तव्य राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते बुधवारी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.