अघोषित भारनियमन नगरकर त्रस्त भाजपा नगरसेवक केली महावितरण कार्यालयाची तोडफोड

0
680

भाजपा नगरसेवक कोतकर यांनी केली केडगाव महावितरण कार्यालयाची तोडफोड

अहमदनगर प्रतिनिधी – सध्या संपूर्ण जिल्हाभर महावितरण कार्यालया कडुन पूर्वसूचना न देता अघोषित भारनियमन सुरू आहे. त्यामुळे जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यातच उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहेत महावितरण विभागाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता अघोषित रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा खंडित केला जातो त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र उष्णतेच्या त्रासामुळे जागे राहून काढावी लागते नागरिक त्रस्त झाल्याने त्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क केला परंतु लोकप्रतिनिधींचा फोन महावितरणचे अधिकारी घेण्यास तयार नाही त्यामुळे केडगाव येथील त्रस्त झालेले भाजपा नगरसेवक मनोज कोतकर यांनी थेट केडगाव येथील महावितरण कार्यालय गाठले महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी फोन उचलत नाही तसेच लोकप्रतिनिधींना जनतेच्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे त्रस्त झाल्याने नगरसेवक मनोज कोतकर यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारत कार्यालयाची तोडफोड केली