2017 साली शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक

0
860

भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याची चर्चा 2017 साली झाली होती; असा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला होता. यावर आता प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान शेलार यांच्या वक्तव्याला मुनगंटीवार यांनी देखील दुजोरा दिला आहे. 2017 साली शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली. त्याचं प्रायश्चित्त भोगतोय, असं सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

मुनगंटीवार यांनी म्हटलं की, 2014 मध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादीचा अदृश्य हात होता. तरी आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवलं. राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्यावर चर्चा देखील झाली. पण शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत सरकार बनवावं असं आमचं मत नव्हतं. त्यामुळे आशिष शेलार जे म्हणाले त्यात तथ्य आहे. पण राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली आणि आता त्याचं प्रायश्चित्त आम्ही भोगतोय, असं त्यांनी म्हटलं आहे.