विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने यादी जाहीर केली असून, पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र पंकजा मुंडेंना यामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. याबाबत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकरांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे
“विधानपरिषदेच्या १० जागासाठी भाजपाचे ५ उमेदार पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी घोषित केले आहेत. आमच्या पक्षामध्ये आम्ही कोरी पाकिटे असतो त्यावर जो पत्ता लिहिला जातो तेथे आम्ही जातो. त्यामुळे राजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय संघटना घेते,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
केंद्रीय संघटनेने घेतलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सर्वांनी मान्य करायचा असतो. पंकजा मुंडे यांच्या नावासाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांना खूप प्रयत्न केले होते. पण केंद्रीय संघटनेने त्यांच्याबाबत काही भविष्यातील विचार केला असेल. कार्यकर्त्यांची नाराजी क्षणभराची असते,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.






