बावनकुळे यांनी बायकोही पळवून आणली… नितीन गडकरी यांचे तुफानी भाषण… व्हिडिओ

0
1257

चंद्रशेखर बावनकुळे यांचा जीवनपट हा संघर्षाचा आहे. ऑटोरिक्षा चालविण्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. विशेष म्हणजे, त्यांनी बायकोपण पळवून आणली आहे.”, असा गौप्यस्फोट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केला.
माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा वसंतराव देशपांडे सभागृहात सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, “बावनकुळेंनी बायको कशी पळवून आणली, त्यांनी कसं केलं ते तुम्हाला आता एकट्यात सांगतील. तरुणांसाठी ते गुपीत उपयोगाचे आहे. पण, ज्येष्ठांनी या भानगडीत पडू नये.”, असा सल्लाही गडकरींनी यावेळी दिला.