भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडच्या भाजप पदाधिकाऱ्यांसोबत मोठ्या जल्लोषात विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार बबनराव पाचपुते, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यासह कर्जत-जामखेड तालुक्यातील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
समर्थकांनी “कोण आला रे कोण आला, कर्जत-जामखेडचा वाघ आला” कोण म्हणतंय होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही. राम शिंदे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करीत राम शिंदेचा उत्साह वाढवला.