भगवान जनन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त आहेत… भाजप नेत्याच्या वक्तव्याने वादंग…

0
19

भगवान जनन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त आहेत, असं विधान भाजपाचे नेते संबित पात्रा यांनी केले आहे.या विधानावरून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी संबित पात्रा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाप्रभू श्री जगन्नाथ हे साऱ्या विश्वाचे भगवान आहेत. अशा महाप्रभूंना एका व्यक्तीचा भक्त म्हणणे म्हणजे ईश्वराचा अपमान आहे. या विधानांमुळे जगभरातील जगन्नाथ भक्त आणि ओडिया लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. भगवान जगन्नाथ हे ओडिया अस्मितेचे प्रतिक आहेत. त्यामुळे संबित पात्रा यांनी केले विधान निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या व्हायरल व्हिडीओनंतर संबित पात्रा यांनी स्पष्टीकरण देत बोलण्याच्या ओघात अनावधानाने हे विधान झाल्याचे ते म्हणाले.