शपथविधीच्या आदल्या रात्री अजित पवार आणि तुमच्यात काय सं’वाद’ झाला ?…भाजपचा शरद पवारांना प्रश्न

0
24

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावर प्रदेश भाजपने फेसबुक पेज वर पलटवार केला आहे.
यात म्हटले आहे की,

अहो शरद पवार, एक गोष्ट लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस जी सुज्ञ आहेत म्हणूनच आजपर्यंत शांत होते.

तुम्ही स्वतः BJP – NCP सरकार स्थापन करुया असा निरोप दिला होता.

पण, तुम्हाला जे हवं ते साध्य झालं नाही म्हणून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत नेहमी सारख तुम्ही कोलांटी उडी घेतली.

पवार साहेब, शपथविधीच्या आदल्या रात्री अजित पवार आणि तुमच्यात काय सं’वाद’ झाला ?

अजित पवार तुम्हाला पहाटेच्या शपथविधीचा निरोप देण्यासाठी सिल्व्हर ओकवर आले होते.

, तुम्ही सकाळी केलेलं ट्विट सुद्धा खोटं होतं. अजित पवार तुम्हाला सांगून शपथविधीला आलेले.