bollywood
नुकतंच रितेश देशमुखने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो चक्क त्याच्या मित्रासोबत रोमान्स करताना दिसत आहे.
रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश हा एका छोट्या बोटीत असल्याचे दिसत आहे. यात रितेश हा चक्क त्याच्या मित्रासोबत रोमान्स करताना दिसत आहे. यात तो ‘ये दिल दिवाना’ हे गाणे गाताना दिसत आहे. यात रितेशचा मित्र हा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता शुभांकर तावडे आहे. त्याचा हा व्हिडीओ वेड या चित्रपटाच्या शूटींग दरम्यानचा आहे. ‘वेड शूट करतानाचा वेडेपणा !! (Madness X BTS X वेड)’, असे कॅप्शन रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे.
रितेश आणि शुभांकर रोमान्स करत असतानाचा व्हिडीओवर जिनिलियानेही प्रतिक्रिया दिली आहे.