Video: नादच खुळा…थेट नवरीबाईने जिममध्येच केलं प्री-वेडिंग शूट

0
13

सध्याच्या काळात प्रत्येक तरुणाईमध्ये प्री-वेडिंग शूटचा क्रे्झ आपल्याला पाहायल मिळत आहे. आजकाल बहुतेक कपल लग्नाच्या आधी प्री-वेडिंग शूट करतात. यासाठी मस्त समुद्रकिनारे निवडतात तर काही किल्ल्याचे ठिकाण निवडतात. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत चक्क एका तरुणीने तिच्या प्री-वेडिंग शूटसाठी जिमची निवड केली आहे. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आपल्याला दिसते की, तरुणी चक्क वधूच्या वेशभूषेत तयार झाली आहे. तिने प्री-वेडिंग शूटसाठी भगव्या रंगाची साडी परिधाण केलेली आहे. यात जीममध्ये तरुणी डंबेल उचलून व्यायाम करताना दिसत आहे. तरुणी व्यायाम करत असताना एक छायाचित्रकार तिचे फोटो काढत आहे. जिममध्ये प्री-वेडिंग शूटचे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. असे प्री-वेडिंग शूट याआधी क्वचितच कोणी केले असेल.