भावंडांच्या प्रेमाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. अनेकदा आपण आई वडिलांना गुरुचं, देवाचं रूप मानलं जातं पण भावा- बहिणीचं नातं याहून घट्ट अशा मैत्रीचं, प्रेमाचं, आपुलकीचं असतं. आजवर आपण सिनेमामधून किंवा अगदी प्रत्यक्षही प्रॉपर्टीच्या नावे अगदी एकमेकांच्या जीवावर उठणारे भाऊ बहीण पाहिले असतील पण हे नातं इतकं कलुषित नक्कीच नाही आणि याची प्रचिती आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून येत आहे. तब्बल १० मिलियनहून अधिक व्ह्यूज असणाऱ्या या व्हिडिओमध्ये नेमकं असं काय खास आहे हे आता आपण पाहुयात.
व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की भाऊ आपल्या बहिणीला सरप्राईझ गिफ्ट देण्यासाठी एक बॉक्स देतो. एवढं छोटं गिफ्ट बघून आधी बहीण थोडी गोंधळून जाते पण त्या बॉक्समध्ये चक्क एका गाडीची चावी दिसताच तिच्या आनंदाला पारावार उरत नाही. ऐश्वर्या भदाणे या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. निव्वळ प्रेम, पहिली गाडी असे कॅप्शन देत ऐश्वर्याने हा व्हिडीओ शेअर केला होता.