तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे 26 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विशेष म्हणजे तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ या दिवशी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्ष या दिवशी महाराष्ट्रात मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. के. चंद्रशेखर राव 26 जूनला तब्बल 400 गाड्यांच्या ताफ्यासह हैदराबादहून महाराष्ट्रात दाखल होतील. ते 27 जूनला पंढरपूरला विठुरायांचं दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथे भालके यांचा बीआरएसमध्ये पक्षप्रवेश होईल.