पैसे कसे खायचे? चक्क ग्रामसेवकानेच सरपंच, सदस्यांना दिले भ्रष्टाचाराचे धडे… व्हायरल व्हिडिओ…

0
3272

बुलडाण्यातील एका ग्रामपंचायत कार्यालयाचा खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. एक ग्रामसेवक आपल्या सरपंच आणि इतर सदस्यांना चक्क भ्रष्टाचाराचे धडे देत आहे. ही सगळी भ्रष्टाचाराची शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ग्रामसेवक हा महिला सरपंचाला म्हणतो की, ‘पावसाळा लागला की जनतेच्या प्रश्नावर आपण कान आणि डोळे बंद करून घ्यायचे आणि जसं जळत तसं जळू द्यायचं कारण जनता बदमाश आहे. शिवाय तुम्हाला जनतेने पैसे घेऊनच मतदान केलं आहे. एकाही चोराने फुकट मतदान केलं नाही.मतदान करणारे चोर आहेत. आपण इथं पैसे खाण्यासाठी बसलो असून पैसे खाणे हा आपला अधिकार आहे.’
मेहकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी, लिपिक आणि महिला सरपंचाच्या वार्तालापाचा व्हिडिओ हाती लागलाय. यामध्ये ग्रामविकास अधिकारी आणि लिपिक हे महिला सरपंचाला पैसे कसे खायचे ?, ते धडे देताना दिसत आहेत.