शेताच्या बांधावरुन वाद होणं काही नवीन नाही. अनेकदा हे वाद कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी किंवा गावातील पंचांमार्फत सोडवले जातात. मात्र, कधीकधी हे वाद विकोपाला जाऊन अघटीत गोष्टीही घडतात. अशीच एक घटना बुलडाणा जिल्ह्यातील आवार येथे घडली आहे. शेत रस्त्यावरुन दोन कुटुंबात फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जिल्ह्यातील आवार येथे शेत रस्त्याच्या कारणावरून 2 कुटुंबात वाद झाला. या वादाचं पर्यवसन तुफान हाणामारीत झालं. त्यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. आवर येथे आमच्या शेतीचे कुंपण का काढले आणि तुम्ही या रस्त्याने का जाता? असे म्हणत दोन गट आपापसात भिडले. यामध्ये मुलांपासून महिलांचाही समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. लाठ्याकाठ्या आणि लोखंडी पाईपचाही वापर यात दिसून येत आहे. या तुबळ हाणामारीत 2 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी खामगाव ग्रामीण येथे तक्रार देण्यात आली आहे. 2 कुटुंबात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
बुलडाणा – शेत रस्त्याच्या कारणावरून तुफान हाणामारी pic.twitter.com/nPr4pQB9GQ
— ram rajesh patil (@RamDhumalepatil) July 18, 2023