दोन दोन हजारात विकले गेलात तुम्ही…. तुमच्या पेक्षा****बऱ्या…. एकनाथ शिंदेंचा आमदार मतदारांवरच भडकला…

0
21

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार कार्यक्रमात आपल्याला मतदान कमी मिळाल्यामुळे खंत व्यक्त केली होती. तसेच आमदार गायकवाड हे यावेळी मतदारांवर भडकल्याचेही पाहायला मिळाले. तुम्हाला फक्त दारू, मटण, पाचशे रुपये पाहिजे, दोन दोन हजारात विकले गेलात तुम्ही &%$#@ &%$$## असे म्हणत, तुमच्यापेक्षा ***** बऱ्या…, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करत अपशब्द वापरले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय गायकवाड यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
https://x.com/Sundarspeak57/status/1875957057091977557
संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदार संघातून विधानसभा निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्जया जयश्री शेळके यांनी कडवे आव्हान दिले होते. जयश्री शेळके यांना 90 हजार 819 मतं पडली होती. तर संजय गायकवाड यांना 91 हजार 660 मतं पडली होती. त्यामुळे अवघ्या 841 मतांनी त्यांचा विजय झाला होता.या विजयानंतर देखील त्यांनी मतदारांवर राग काढला आहे.