जगात सर्वात जास्त प्रेम करणारे आई-वडिल बऱ्याचदा आपल्या मुलांच्या जीवावर उठतात. असा विचार केला तरी अंगावर काटा येतो. मात्र प्रत्यक्षात अशा काही घटनाही समोर येतात जिथे आई-वडिल मुलांसाठी काळ ठरतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. स्वत:च्या हट्टपायी आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही पालक आपल्याच मुलांना नको ते करायला भाग पाडतात. किंवा आपल्यासोबतच आपल्या मुलांचाही जीव धोक्यात घालतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका वडिलांनी स्वत:ची हौस पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलासोबत बंजी जंप करताना दिसत आहेत. बंजी जंपिंग दरम्यान, वडील कोणत्याही सुरक्षेशिवाय मुलाला आपल्या मिठीत धरुन हजारो फूट उंचावरुन उडी मारत आहेत. जे खूप धोकादायक आहे. या बंजी जंपिंगमध्ये वडिलांनी पूर्ण सुरक्षितता घेतली आहे पण मुलाला ना बांधले आहे ना सुरक्षेसाठी कोणते जॅकेट घातले. यामध्ये वडिलांचा निष्काळजीपणा स्पष्ट दिसतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक या वडिलांना जगातील सर्वात वाईट पिता म्हणत अटक करण्याची मागणी करत आहेत.
बाळाला घेऊन हजारो फूट उंचावरुन उडी मारली, अंदाज चुकला अन्…थरारक व्हिडीओ
- Advertisement -