पुणे, शिवाजीनगरहून जालना, अहमदनगर, संभाजीनगरला, जाणाऱ्या बस रद्द, काल दुपारपासून बस रद्द, मराठा मोर्चा आंदोलन पेटले असल्यानं एसटी प्रशासनाचा निर्णय, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रद्द करण्याचा निर्णय
जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा समाज बांधवांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज पंढरपुरात ठिकठिकाणी रास्ता रोको व निदर्शने करण्यात आली आहेत. पंढरपूर टेंभुर्णी महामार्गावर भोसे गावामध्ये देखील ग्रामस्थांनी एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन केले.
सुमारे दोन तासांपासून आंदोलन सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याने पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.