शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचे नेते संजय राऊत यांनी जेही वक्तव्य केले त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राहायचे का नाही, याबाबत त्यांचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कळवावा. चर्चेने एकत्र बसून प्रश्न मिटला असता, असे मंत्री छगन भुजबळ यांनी आज स्पष्ट केले.
भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजिबात काळजी करीत नाही. विरोधी पक्षात बसून लढण्याची आम्हाला चांगली सवय आहे. आमची तयारी आहे त्यांना जे काही सांगायचे ते त्यांनी शरद पवार यांना सांगावे असेही भुजबळ म्हणाले.






