भुजबळ यांचे पुष्कळ लाड केले असून, अजून किती लाड करायचे?.. अजितदादांच्या मंत्र्याचे वक्तव्य…

0
40

मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत, त्याबाबत बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे म्हणत असतील, तरी मला तसं काही वाटत नाही. पक्षाने छगन भुजबळ यांचे पुष्कळ लाड केले असून, अजून किती लाड करायचे? असा सवाल देखील राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला आहे. जो जे वांच्छिल ते तो लाभो. त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊ द्यात. माझे नेते अजित पवार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. माझे दुसरे कोणीही नेते नसल्याचे कोकाटे यांनी म्हटलं आहे.