२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी भाजपचे ४२ ते ४३ खासदार निवडून येणार. तसेच विधानसभा निवडणुकीतही भाजपचे २८८ पैकी १६० ते १७० आमदार निवडून येणार आहेत, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयी मिरवणुकीत बोलत होते.
खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत चंद्रकांत पाटील यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले, त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान दाखवावे लागते. तरीही ही निवडणूक आम्ही जिंकली. विधानपरिषदेला तर गुप्त मतदान असते. म्हणूनच मी म्हणालो होतो ‘ये तो अभी झाकी है, बिस तारीख बाकी है’.






