पंकजा मुंडे म्हणाल्या , गुन्हेगारी करणारे असतो तर दरोडे टाकायला गेलो असतो ना… सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम…

0
77

Beed सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. सुरुवातीला मारेकऱ्यांना मोकळे रान करून देणाऱ्या यंत्रणांना जनरेट्यापुढं अखेर कारवाई कारवाई करावी लागली. या हत्या प्रकरणातील 7 आरोपींना मकोका लावण्यात आला. दरम्यान, या हत्या प्रकरणावरुन मुंडे बंधु-भगिनींवर स्थानिक लोकप्रतिनीधींकडून आरोप होत आहेत. यावर आता भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडेंनी वक्तव्य केलं आहे.

पंकजा मुंडेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांना अनेक विषयांवर भाष्य केलं. बीडच्या बिहार होतोय, अशी टीका विरोधकांकडून होतेय. यावर बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला परळीतील गुन्हेगारीची आकडेवारी माहित नाही. धस यांच्यामुळेच तर बीड बदनाम झालं आहे. या घटनेची ज्या पद्धतीने मांडणी झाली. त्यामुळे बीड बदनामं झालं. राजकीय भूमिका न घेता हा विषय संवेदनशीपणे समजून घेतला असता, तर बीड असं बदनाम झालं नसतं. आमच्या जिल्ह्यात लोक स्वाभिमानी आहेत. मी महिला राजकारणी म्हणून इथं काम करते. सगळ्यात कष्टाचे जीवन असणारे लोक आमच्या जिल्ह्यात आहेत. आम्ही काम करतो, गुन्हेगारी करणारे लोक असते तर दरोडे करायला गेलो असतो ना, असा पंकजा मुंडे म्हणाल्या.

गुन्हेगारी सगळीकडेच आहे. माझ्याकडे सर्वच जिल्ह्यांचा रेकॉर्ड आहे. मुळशी पॅटर्नच्या घटना आहेत. नागपूरमध्ये महिलेला पायावर नाक घासून माफी मागायला लावल्या गेलं. पुण्यात नुकतीच एका तरुणीची निर्घृण हत्या केली गेली. या घटना सगळीकडे घडत आहे. या घटनांचं राजकारण न करता अत्याचार थांबवण्यासाठी कारवाई केली पाहिजे,असं त्या म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीविषयी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर मी काउंटर करणार नाही. ते जर म्हणत असतील की तपास पूर्ण होईपर्यंत कारवाई करणार नाही. तर त्यावर मी रोज काय बोलू, असं पंकजा यांनी म्हटलं.