छगन भुजबळ आक्रमक…..छगन भुजबळांनी मोठा निर्णय घेतला

0
59

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर महायुतीच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांना स्थान मिळालं नाही. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी नाशिकमधील समता परिषदेच्या मेळाव्यात भूमिका स्पष्ट केली. ‘मी आता संपूर्ण राज्यात जाणार आहे. ओबीसींचा एल्गार पुकारणार असल्याचे स्पष्ट करत लढा आणखी तीव्र करणार असल्याची भूमिका छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली.

मी काल नाशिक आणि येवला येथील लोकांशी बोललो. सगळ्यांना शॉक बसला आहे. फक्त नाशिक आणि येवलामध्येच नाही, सर्व राज्यात हीच परिस्थिती आहे. देशातून मला फोन आणि मेसेज सुरु आहेत. आमच्याकडे या अशी मागणी सगळीकडून सुरू आहे. शांत बसलेले सर्व पेटून उठले आहेत. पेटून उठलात तरी पेटवापेटवी करू नका. आता हिंसक आंदोलन नको.दलित,मागासवर्गीय, ओबीसी जसे सोबत आहेत, तसे मराठा समाजातील नागरीकही सोबत आहेत. मराठा समाजातील लोकांनीही निवडणुकीत माझं काम केलं. आपले सगळेच शत्रू नाहीत. आम्हाला संपवण्यासाठी निघालेल्यांना आमचा विरोध आहे. आरक्षण मिळाल्यावर सगळंच बदलतं असं नाही. मागासवर्गीय लोकांना आरक्षण दिले तर हळूहळू वर येतील अशी भावना त्यावेळी होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी कधीच विरोध केला नाही.विधानसभेत मुद्दा आला, तेव्हा पहिला हात मी वर केला. पण त्यांना वेगळं आरक्षण द्या. ईडब्लूएसच्या १० टक्के आरक्षणात एकट्या मराठा समाजाला साडे आठ टक्के आरक्षण मिळत होते.

आमच्यावर कुरघोडी करण्याचे जे प्रयत्न करत आहेत, त्यांना आमचा विरोध आहे. आता पुन्हा एकदा जाळपोळ होता कामा नये. तेव्हा लोक काय? नेते देखील घाबरलेले होते. आम्ही तेव्हा कोणाच्या विरोधात बोललो, ते मला सांगा. तेव्हा काही मेळावे झाले, त्यामुळे सगळ्यांना धीर मिळाला. हम एक है, तो सेफ है.

माझ्या मतदारसंघात हे महाशय आले, हातात सलाईन लावून. मी राहीन का नाही? मला माहित नाही, असे त्यांनी त्यावेळी सांगितले. त्याचा परिणाम देखील झाला. मला कमी लीड मिळालं. मात्र, माझ्या मागे ठामपणे मतदारसंघातील नागरिक उभे राहिले.
मला मंत्रिपदाची आस नाही, जर असता तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अंबडच्या सभेला आलो नसतो. आता महापालिका,जिल्हापरिषदेच्या निवडणुका आहेत. फक्त लाडकी बहीण योजनेमुळे आमदार म्हणून निवडून आले नाहीत. लाकडी बहीणमुळे आमदार निवडून आले, असं अनेकांना भ्रम झाला आहे. मात्र इतर गोष्टी देखील आहेत. आता आम्ही रस्त्यावर लढाई घेऊन जाऊ. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी आता पुन्हा एकदा ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. दिल्लीमध्ये रामलीला मैदान भरवलेले मैदान पाहिलं आहे.