कॉंग्रेस प्रवेशासाठी एकनाथ शिंदे आमदारांसह पृथ्वीराज चव्हाण यांना भेटले होते

0
615

हिंदुत्वासाठी आम्ही युती केल्याचं सांगणाऱ्या एकनाथ शिंदे सरकारच्या अजेंड्यावर संशय निर्माण करणारं एक वक्तव्य सध्या राजकारणात चांगलंच गाजतंय. अशोक चव्हाणांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केलाय. महाविकास आघाडीपूर्वी म्हणजेच युती सरकारमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव घेऊन आलेल्यांमध्ये एकनाथ शिंदे हेदेखील होते, असं चव्हाण म्हणालेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही या वक्तव्याला दुजोरा दिलाय
चंद्रकांत खैरे म्हणाले, अशोक चव्हाण खरं म्हणाले. त्यापुढेही जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे शिंदेंनी खूप चकरा मारल्या, हेही मला माहिती आहे.

ते 10 ते 15आमदारांना घेऊन गेले होते, असं आमचे त्यावेळचे मित्र संजय शिरसाट यांनी सांगितल्याचं खैरेंनी म्हटलं….