मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सबाजीराव गायकवाड यांच्या बांबू शेतीचे कौतुक

0
15

नगर : पर्यावरण संरक्षण रक्षणासाठी 9 जानेवारी रोजी मुंबई येथे शाश्वत पर्यावरण विकास परिषद आयोजित करण्यात आली होती . या परिषदेसाठी अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून प्रशांत गायकवाड व राजेन्द्र नन्वरे यांना राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. आ. श्री. पाशा पाटील साहेबांकडून विशेष आमंत्रित करण्यात आले होते .हे शाश्वत पर्यावरण विकास परिषद बांबू शेतीवर आधारित होती.या परिषदेमध्ये बांबू शेतीची लागवड, जोपासना, संगोपन, वाढते तापमान वाढ या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. त्यावेळी प्रशांत गायकवाड यांनी गायकवाड फार्म वाळुंज येथील 40 एकर 25 वर्ष जुनी बाबू शेती लागवडीची छायाचित्र राज्याचे मुख्यमत्री मा. ना . श्री एकनाथ शिदे यांना दाखविले .गायकवाड फार्म ची बाबू शेती ने मुख्यमंत्री साहेब प्रभवित झाले त्यांनी प्रशांत गायकवाड यांच्या बांबू शेतीचे विशेष कौतुक करून “जुने स्नेही सबाजीराव गायकवाड ” तब्येतीची विशेष चौकशी केली.

या परिषदेमध्ये उद्योग क्षेत्रातील नामवंत मा. श्री नादिर गोदरेज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा .श्री रमेशजी बैस केंद्रीय कृषि सचिव मा.श्री मनोज आहुजा आंतराराष्ट्रीय सौरऊर्जा महासंचालक मा.श्री डॉ.अजय माथूर केंद्रीय बांबू अभियान संचालक मा.श्री प्रभात कुमार केंद्रीय वन शास्त्राज्ञ डॉ. अजय ठाकुर INBAR चे महासंचालक मा. श्री अली मुच्युमो आसाम येथील न्यूमालीगड येथे नेदरलँड फिनालॅड व भारतसरकारच्या संयुक्त विद्यमाने शेतीपासून निर्मिती करणाऱ्या आसाम बायोरिफाय नरी चे चेअरमन मा.श्री भास्कर फुकान व इतर नामवंत मान्यवर या परिषदेला मार्गदर्शन केले.
अहमदनगर जिल्ह्यात बांबू शेती अधिक वाढवण्यासाठी प्रशांत गायकवाड यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील इतर शेतकरी वर्गाला प्रशिक्षण व प्रोत्साहित करण्यावर भर देण्याची सूचना राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथ शिंदे तसेच राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री पाशा पटेल साहेब यांनी व्यक्त केली.