संभाजीनगरमधील एका सरपंचाने स्वत:ची कार जाळून निषेध नोंदवला आहे. विहिर मंजूर करण्यासाठी लाच मागितल्यानंतर पैशांची उधळण करणाऱ्या फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी आता पुन्हा एकदा हटके आंदोलन केले आहे. मंगेश साबळे यांनी वर्षभरापूर्वीच घेतलेली नवी चारचाकी पेट्रोल टाकून जाळून टाकली. मराठा आंदोकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध करत करत त्यांनी फुलंब्रीतील पाल फाटा येथे ही कार जाळत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी मंगेश साबळे यांच्यासोबत काही मराठा आंदोलकही होते.
आमच्या लोकांवर हल्ला होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही स्वत:ची गाडी जाळली, पुढे आम्ही स्वत:ला जाळून घेऊन निषेध व्यक्त करू, ज्यांनी हा लाठीचार्ज केला त्यांच्यावर सरकारने दोन दिवसांत कारवाई करावी, अन्यथा आम्ही स्वतला जाळून घेऊ, असा इशाराही सरपंच साबळे यांनी दिला आहे.