वरळीतल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातला एक व्हिडिओ शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना नागरिक जात असताना तसंच कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या खूर्च्या रिकाम्या दिसत आहेत.
हा व्हिडिओ शेअर करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. @वरळी कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला. कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय. 32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना?’, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांच भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. @वरळी
कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला..
कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय..
32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना? pic.twitter.com/FoYvWFVTIn— Sanjay Raut (@rautsanjay61) February 7, 2023