मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन आपला पदभार स्विकारला. हा पदभार स्वीकारण्याच्या अगोदर मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा घातली होती. ही ‘सत्यनारायण पुजा’ घातल्याबद्दल आता मानवी हक्क कार्यकर्ते विकास शिंदे यांनी राज्यपालांना पत्र लिहंल असून या पत्राद्वारे त्यांनी या मंत्रालयातील धार्मिक विधी बाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे. तसंच राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडने देखील या विधीचा निषेध केला आहे.
या पत्रात ते लिहितात, ‘भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्वाची पायमल्ली करत मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आलेल्या ‘सत्यनारायण पुजा’ या धार्मिक विधी बाबत तक्रार. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर संविधान आणि कायद्याला साक्ष ठेवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपण शपथ दिली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याआधी आज मुख्यमंत्री कार्यालयात सत्यनारायणाची पुजा घातल्याचे पाहायला मिळाले.