मुख्यमंत्री शिंदे यांनी कुटुंबियांसह घेतली पंतप्रधान मोदींची भेट….

0
32

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रूद्रांश शिंदे हे उपस्थित होते. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीचे तपशील दिले. तसंच भेटीचं कारणही सांगितलं. ही सदिच्छा भेट असल्याचं ते म्हणालेत. ज्यातील पावसाची परिस्थिती इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत पंतप्रधानांसोबत चर्चा झाली. राज्यातील प्रकल्पही चर्चा झाली, शेतकरी आरोग्य क्षेत्राबाबतही पंतप्रधान यांच्यासोबत चर्चा झाली, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.