श्रीरामपूर शहरात काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विद्यमान शहराध्यक्ष संजय छल्लारे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयाजवळ हे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर ‘साहेब गद्दारांना क्षमा नाही, आय सपोर्ट उद्धव ठाकरे’ असा मजकूर लिहिलेला आहे. भगव्या रंगाच्या या बॅनरवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शहराध्यक्ष संजय संजय छल्लारे यांचा गळ्यात भगवे उपरणे घातलेला फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे.