बाळासाहेब थोरात म्हणाले…. आम्हाला त्यांनी भाजप पर्यंत पोहोचवले…

0
34

अपक्ष आमदार काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तांबे कुटुंब तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप तांबे यांनी केला. अखेर यावर थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विधानपरिषद निवडणूक दरम्यान जे काही घडलं. जे काही राजकारण झालं ते व्यथीत करणारं होतं. या सर्वाबद्दल मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आपले म्हणणं सांगितलं आहे. याबाबत योग्य ते विचार करू असं पक्षाला कळवलं आहे. जे काही घडलं ते व्यथीत करणारं असलं तरी, असा संघर्ष कायम करत आलो आहोत. यशस्वी सुद्धा झालो आहे. यातून आम्ही बाहेर पडू,” असे स्पष्टीकरण थोरात यांनी केले आहे.

डॉक्टरांनी प्रवास करू नका असं मला सांगितलं होतं. म्हणून मला कुठे जाता आलं नाही. ते पुढे म्हणाले, मधल्या काळात अशा काही बातम्या आल्या की, आम्हाला त्यांनी भाजपपर्यंत पोहचवलं होतं. मात्र आपला काँग्रेस आहे. काँग्रेस हा आपला विचार आहे. आपण नेहमी काँग्रेस सोबत राहू, असे ही यावेळी थोरात म्हणाले.
यावेळी त्यांनी नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांना आमदार झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.