नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळविला. यानंतर तांबेंनी पत्रकार परिषदेत पटोलेंवर गंभीर आऱोप केले होते. यानंतर आता बाळासाहेब थोरातांनीही तांबे- पटोले वादावर तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं आहे.
माझ्याविषयी इतका राग असेल तर पटोलेंबरोबर काम करू शकत नाही. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आले.सार्वजनिकरीत्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली असाही आरोप थोरात यांनी यावेळी केला.