माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह ९ कॉंग्रेस आमदार अडचणीत… हायकमांडने बजावली नोटीस

0
1090

राज्यसभा व विधानपरिषद निवडणुक तसेच नव्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरून महाराष्ट्र कॉंग्रेस मधील बेबनाव समोर आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे तब्बल 11 आमदार अनुपस्थित होते. यापैकी 9 आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. या संपूर्ण प्रकारची चौकशी करण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोहन प्रकाश यांची नियुक्ती केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसच्या अनेक आमदारांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केलेली. तसेच त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी केली होती.