काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, दुसऱ्यांची लायकी आणि दुसऱ्यांचा मेंदू काढणारे मेंदूहीन राज ठाकरे आज आम्हाला दिसून आले.
यावेळी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, तुम्ही थोर महापुरुषांच्यावर होणारी चिखलफेक थांबवा म्हटले आहे.
पण तुम्ही ज्या महापुरुषाचे नाव घेऊन राजकारण करत आहात त्या महापुरुषांनी धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन केले असल्याचे अतुल लोंढे यांनी सांगितले.
ज्या महापुरुषांच्या दाखले तुम्ही देता, त्या महापुरुषांनी माफी मागितल्यानंतर देशात येऊन स्वातंत्र्याचा जयघोष न करता त्यांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला आहे.
त्याच बरोबर त्यांनी इंग्रजांची गुलामगिरी करुन येथील स्वातंत्र्यवीरांच्या विरोधात ते उभा राहिले असल्याचा इतिहासही अतुल लोंढे यांनी सांगितला.






