काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे यांच्याबाबत आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक महत्वाची मागणी सोशल मीडियावर केली आहे. तांबे यांचं निलंबन रद्द करुन काँग्रेसने त्यांना सन्मानपूर्वक पुन्हा पक्षात घ्यावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांचं निलंबन रद्द करून काँग्रेसने त्यांना सन्मानपूर्वक पुन्हा पक्षात घ्यावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
हा नेता अजूनही भाजपमध्ये गेला नाही, हे लक्षात घ्या, असं म्हणत सत्यजीत तांबे यांच्यासारख्या युवा आणि काँग्रेसशी वर्षानुवर्षे एकनिष्ठ राहिलेल्या नेत्याला संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.