नगरसेवक असावा तर असा! स्वत: तुडुंब भरलेल्या गटारात उतरून केली सफाई….व्हिडीओ

0
9

महापालिकेच्या स्वच्छता विभागाची असते. मात्र, उत्तर प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील एका नगरसेवकाने जे केले त्यासाठी त्यांचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.

ग्वाल्हेरमध्ये उघडी गटारे आणि वाहते पाणी यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्वाल्हेर नगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे, तरीही ग्वाल्हेरमधील महापालिकेचे अधिकारी भाजपा नगरसेवकाचे ऐकत नसल्याचा आरोप आता केला जात आहे. यामुळे ग्वाल्हेर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग १५ मधील नगरसेवक देवेंद्र राठोड यांनी स्वत: तुडुंब भरलेल्या गटारात उतरून सफाई केली, ड्रेनेजमध्ये उतरण्याचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.