मिठी मारली, अंगावर ब्लँकेट घेतलं अन्….धावत्या दुचाकीवर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

0
16

सोशल मीडियावर कपल्सचे मेट्रो ट्रेन, दुचाकी किंवा रेल्वे स्टेशनवर खुल्लम खुल्ला प्यार करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. यातील काही व्हिडीओमध्ये दुचाकीवर रोमान्स करतानाचे देखील काही व्हिडीओ समोर आले आहेत. अशात आता दुचाकीवर रोमान्स करतानाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण दुचाकी चालवत आहे. तरुणी त्याला समोरुन मिठीत घेत टाकीवर बसलीये. तसेच तिने स्वत:च्या आणि प्रियकराच्या अंगावर ब्लँकेट घेतलं आहे. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. दुचाकीवर बसल्यानंतर तर आणखी जास्त थंडी वाजते. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रेमी युगुलाने असा जुगाड शोधलाय.