वाळूउपशाची पुनरावृत्ती होऊ नये‎ यासाठी क्रॅश सॅण्ड धोरण राबवणार‎,विखे पाटील

0
16

शासकीय कामाच्या नावाखाली यापूर्वी ‎ ‎ मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा ‎ ‎ झाला. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये‎ म्हणून सर्व शासकीय कामांकरिता क्रश‎ सॅण्ड वापरण्याचे धोरण शासन घेणार ‎ ‎ असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन ‎ ‎ आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री‎ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.‎

शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या ‎ ‎ पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील‎ यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांसह‎ अस्तगाव आणि पंचक्रोशीतील‎ गावांमधील नागरिकांच्या भेटी घेऊन‎ ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची‎ तातडीने सोडवणूक करण्याच्या सूचना‎ त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रांताधिकारी‎ माणिक आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी‎ अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार‎ अमोल मोरे, गटविकास अधिकारी‎ जालिंदर पठारे, उपविभागीय अधिकारी‎ विलास गायकवाड, जलसंपदा विभागाचे‎ महेश गायकवाड, बांधकाम विभागाचे‎ देविदास धापटकर उपस्थित होते.‎ मंत्री विखे पाटील म्हणाले, शासन‎ आपल्या दारी या उपक्रमातून नागरिकांचे‎ ‎प्रश्न आणि शासकीय कार्यालयात‎ कागदपत्र किंवा योजनेचा लाभ‎ मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर‎ करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची‎ आता सरकारने मुदतही ३० ऑगस्टपर्यंत‎ वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले.‎ मागील काही दिवसात महसूल‎ विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन‎ लोकाभिमुख निर्णयाची अंमलबजावणी‎ सुरू केली. यामध्ये प्रामुख्याने ६०० रुपये‎ दराने वाळू उपलब्ध करून दिली. वाळू‎ माफियांना मोठी धास्ती या निर्णयाची‎ आहे. सध्या वाळू माफिया नव्या‎ धोरणाला बदनाम करण्याचे प्रयत्‍न करीत‎ आहेत. मात्र कोणाच्याही दबावाला बळी‎ न पडता हे धोरण यशस्वी करणार ‎ असल्याचा दावा मंत्री विखे पाटील यांनी ‎ ‎ केला.

सरकारने शेतकरी‎ हिताचे निर्णय घेतले‎ कृषी विकासासाठी राज्य सरकारने‎ शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून पूर्वी‎ आपण कोरडवाहू शेती अभियानातून‎ विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला‎ होता. त्याच धर्तीवर आता मागेल त्याला‎ शेततळे, शेडनेट अस्तरीकरणासाठी‎ कागद उपलब्ध करून देण्याचा निर्णय‎ घेतला. पीक विमा योजनेतही महत्त्वपूर्ण‎ बदल करण्यात आला आहे. आता‎ शेतकऱ्यांवर कोणताही अर्थिक भार येवू‎ न देता अवघ्या एक रुपयात सरकारच‎ पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना‎ मिळवून देणार असल्याचे मंत्री विखे‎ पाटील यांनी सांगितले.