Crime News. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी गावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. बलायदुरी ग्रामपंचायतीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून काही रक्कम तक्रारदार शिपायाला दिली जाणार होती. 1 लाख 64 हजार 682 रुपये इतकी ती रक्कम होती. हीच रक्कम देण्याच्या बदल्यात ग्रामपंचायतीचे आजी माजी संरपंच आणि ग्रामसेवक यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली, त्यानंतर 60 वर्षीय तक्रारदार यांनी थेट एसीबीचं कार्यालय गाठलं.सेवानिवृत्त झालेले शिपाई यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सर्व माहिती दिली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.