Crime news…’कानून के हाथ लंबे होते है’..तिने 3 प्रियकरांच्या मदतीने नवर्‍याला संपवले, 9 महिन्यानंतर पोलिसांनी गाठलेच

0
794

बीड : बीडमध्ये अनैतिक संबंधसाठी सख्खा पुतण्या, भाचा आणि अन्य एकाने विवाहितेच्या पतीचा खुनाचा कट रचला. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच तीन प्रियकरांच्या मदतीने त्याच्या शरीराचे दोन तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
बीडच्या माजलगाव तालुक्यातील बाभळगाव इथले दिगंबर गाडेकर हे सप्टेंबर २०२१ पासून गायब होते. ते बेपत्ता असल्याची नोंदही पोलिसांत करण्यात आली होती. ११ मे रोजी शेलगाव थडी शिवारात एका विहिरीत एका अज्ञात व्यक्तीचा कंबरेखालचा भाग आढळून आला. पोलिसांना याची माहिती मिळताच कसून तपास सुरू झाला. यावेळी अर्धवट असेल्या मृतदेहाच्या खिशात काही महिलांचे आधारकार्ड सापडले. पोलिसांनी संबंधित महिलांशी चर्चा केली असता त्यांनी आधारकार्ड दिगंबर गाडेकर यांना दिले असल्याची माहिती समोर आली.

यानंतर पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली आणि तपास केला असता हा खूनाचा धक्कादायक प्रकार समोर आला. गाडेकर यांचा पुतण्या गणेश गाडेकर, भाचा सोपान मोरे आणि बाबासाहेब घोगाने या तिघांनी मिळून त्यांचा खून केला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. या तिघांचेही मयताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे हा कट रचल्याचं त्यांनी पोलिसांत कबूल केलं आहे. दरम्यान, या घटनेमध्ये आरोपी पत्नी फरार असल्याची माहिती आहे.