Video: कार्यकर्त्याने खांद्यावर हात ठेवला.. उपमुख्यमंत्र्यांनी थेट कानाखाली लगावली

0
19

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे धुमशान सुरू आहे. निवडणुकांमुळे अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, रॅलींचा धडाका सुरू आहे. इलेक्शनच्या काळात नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने फिरताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी फक्त खांद्यावर हात ठेवल्याच्या रागातून पक्षाच्या कार्यकर्त्याच्याच कानाखाली मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत भाजपने जोरदार निशाणा साधला आहे.
रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी डी. के. शिवकुमार आले अन् ते गाडीतून उतरताच त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांनी गराडा घातला. याचवेळी एका हौशी कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवला. याचाच उपमुख्यमंत्र्यांना राग आला आणि त्यांनी तिथेच त्या कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली.