निलेश लंकेंच्या प्रचारासाठी असलेल्या एका सभेत अमोल कोल्हेंनी तुफान डायलॉगबाजी केली. बॉलिवूडच्या दिवार चित्रपटातील संवाद म्हणत, अमोल कोल्हेंनी विरोधकांवर थेट निशाणा साधला. आता अमोल कोल्हेंच्या याच डायलॉगबाजीला महायुतीचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी डायलॉगबाजीनंच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हमारे पास सब कुछ है, तुम्हारे पास तो सिर्फ गुंडाराज है, असा टोला विखेंनी कोल्हेंना लगावला आहे. तसेच, लोक गुंडाराजच्या विरोधात मतदान करणार असल्याचंही यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. अमोल कोल्हेंनी एका सभेदरम्यान तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांचा दिवार चित्रपटातील डायलॉग मारत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यावर आता राधाकृष्ण विखेंनी जोरदार पलटवार केला आहे. “जर त्यांचा उमेदवार एवढा सक्षम होता, तर अमोल कोल्हे तरी लंकेच्या प्रचारासाठी का आले?” असं विखे म्हणाले आहेत. स्वतः अमोल कोल्हे यांचाच पराभव निश्चित असल्याचं विखे म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देशाच्या भविष्यासाठी योजना आहेत, पण अमोल कोल्हे यांच्याकडे आणि त्यांचे नेते शरद पवार यांच्याकडे काय आहे देशासाठी? असा सवाल विखेंनी केला आहे.
हमारे पास सब कुछ है, तुम्हारे पास तो सिर्फ गुंडाराज है… विखे पाटील यांचे कोल्हेंना जोरदार प्रत्युत्तर
- Advertisement -