कोणाच्या दसरा मेळाव्याला अधिक गर्दी होती?, पोलिसांनी सांगितला खरा आकडा

0
3335

मुंबई : मुंबईतील शिवाजीपार्कवरील उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्याला अधिक गर्दी होती, असं ठाकरे गटाने कबुल केलं आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण वाचण्यास सुरुवात करताच ५० टक्के लोक सभेतून निघून गेले, असा टोलाही ठाकरे गटाकडून लगावण्यात आला आहे.

शिवाजीपार्कवरी दसरा मेळाव्याला अडीच लाखाहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली. तर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला ३ लाखांची गर्दी होती, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. पण गेल्या काही वर्षांची तुलना करता उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला आतापर्यंतची सर्वाधिक गर्दी होती, असं सांगण्यात येतंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिलाच दसरा मेळावा होता. मुंबईत बुधवारी झालेली दोन दसरा मेळावे पाहता उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला १ लाख तर मुख्यमंत्री शिंदेंच्या मेळाव्याला २ लाखाची गर्दी होती, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शिवाजीपार्कची क्षमता ही ८० हजारांची आहे. तर बीकेसी मैदानाची क्षमता १ लाख इतकी आहे. शिंदे गटाकडून मैदानावर ३ लाख लोकांची जेवण्याची व्यवस्था केली होती.