स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये (Davos) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 45,900 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत सध्या डाव्होस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. आज विविध कंपन्यां समवेत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून सुमारे 10 हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितली.
यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.