उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, घड्याळावर दावा…

0
19

राज्याचे विरोधपक्ष नेते अजित पवार हे यांनी काही समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आज अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, मी आणि राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनी शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विकासाचा एकमेव मुद्दा पाहून हा निर्णय घेतला आहे. आम्ही कुणाच्याही टीका टिप्पणीला उत्तर देणार नाही. बहुतेक आमदारांना माझा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी होत असून पक्षाचं नाव, चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांनी ठामपणे सांगितलं.