शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्या नंतर अजित पवार पहिल्यांदाच शनिवारी आपल्या बारामती मतदारसंघात दाखल झाले. यावेळी बारामतीकरांनी अजित पवार यांच्यावर पुष्पवृष्टी करत अभूतपूर्व स्वागत केलं. या स्वागतानंतर अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत तुफान फटकेबाजी केली.
मी कोणालाही बळजबरी केली नव्हती. लोकांचा उत्साह, प्रेम, आपुलकी मिळत होती. काय तो फुलांचा आणि पाकळ्यांचा पाऊस पडला होता. अशा फुलांच्या पाकळ्या बारामतीतील रस्त्यांनी पाहिल्या नव्हत्या. एवढं ढकला-ढकली आणि रेटा-रेटी आयुष्यात कोणी मला केली नाही,” अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली.
हातात-हात दिल्यावर लोक ओढायचे… हात ओढले की वाटायचं, डावा तुटून पडतोय की उजवा तुटतोय. काही-काही हात धरून किस घ्यायचे… बायकोने एवढे किस घेतले नाहीत, तेवढे किस घेण्यात आले. आरं काय चाललं आहे? पण, आज ठरवलं होतं चिडायचं नाही… सगळ्यांना फक्त नमस्कार करायचा,” असं अजित पवार म्हणाले आणि एकचा हशा पिकला.






