अजित पवार उपमुख्यमंत्री, शरद पवारांनी विरोधी पक्षनेतेपदी केली नवी नियुक्ती…

0
33

अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. आज राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोबत ९ मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आपण हा निर्णय राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतला असल्याचे सांगितले

त्यानंतर लगेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ८० टक्के आमदार परत येतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवाय जे गेले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रदोतपदीही जितेंद्र आव्हाड राहणार आहेत.