उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजस्थानात… विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती…

0
35

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचारात उतरले आहेत.अजमेरमध्ये फडणवीस यांनी भर पावसात सभा घेतली. राजस्थान दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी फडणवीस यांनी केकडी, नसिराबाद, किशनगड, अजमेर ग्रामीण आणि अजमेर शहरात जाहीर सभा घेतली. या दौर्‍यात सी. पी. जोशी, विजया रहाटकर आणि अन्य स्थानिक नेते त्यांच्यासोबत होते. परिवर्तन रथात सुद्धा जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात आलं.
या जाहीर सभांमध्ये संबोधित करताना ते म्हणाले की, ‘राजस्थानात भाजपाला जे परिवर्तन घडवायचे आहे, ते परिवर्तन म्हणजे केवळ सत्ता परिवर्तन नाही. सत्ता परिवर्तन म्हणजे एक मुख्यमंत्री बदलून दुसरा किंवा एक मंत्री बदलून दुसरा मंत्री असे नाही. तर दलित, पीडित, शोषित, सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी हे परिवर्तन हवे आहे. हे समाज परिवर्तनाचे मिशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 कोटी लोकांच्या जीवनात मोठे परिवर्तन केले आणि त्यांना गरिबी रेषेतून बाहेर काढले.’