ॅकेंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बहुचर्चित विस्टाडोम या बोगी मधून खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मुलगी अनिशा सह पुणे ते मुंबई प्रवास केला.
खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे की,
प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा रेल्वे प्रवास देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना अनुभवता यावा या दृष्टिकोनातून विस्टाडोमची सुरुवात करण्यात आली आहे.
पुणे- मुंबई- पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसला विस्टाडोमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आज पुणे ते लोणावळा प्रवासादरम्यान निसर्गरम्य परिसर, धबधबे पाहून परदेशात आल्यासारखं वाटलं. या मनमोहक सौंदर्याचा मुलीसोबत आनंद घेतला.
सदरील संकल्पना राबविल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांचे मनःपूर्वक आभार..
मला पूर्ण विश्वास आहे की मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली रेल्वे विभाग अजून प्रगती करेल व असे नवनवीन उपक्रम यापुढेही येत राहतील.
आपण सर्वांनीही डेक्कन क्वीन विस्टाडोमद्वारे आपल्या मुलांसह प्रवास करावा, निश्चितच आपल्यालाही एक सुखद अनुभव येईल.