शहरात असलेल्या वाडिया पार्क येथील बंद पडलेला जलतरण तलाव सुरु करण्याबाबत माजी महापौर भगवान फुलसोंदर यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन तातडीने तलाव सुरु करण्याची केली मागणी
नगर- शहरातील वाडियापार्क मधील जलतरण तलाव मागील सहा महिन्यापासून बंद आहे .जलतरण तलाव बंद असल्यामुळे शहरातील नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नाही . या जलतरण तलावाचा फायदा शहरातील खेळाडू ,रुग्ण यांना मोठ्या प्रमाणात होत असतो .जलतरण तलावामध्ये पोहण्याचा व्यायाम होत असल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य सुधारते .हा जलतरण तलाव बंद झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .तसेच खेळाडूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे . तरी हा बंद पडलेला जलतरण तलाव तातडीने सुरु करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माजी महापौर भगवानराव फुलसोंदर यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना दिले यावेळी बजरंग भुतारे ,चंद्रकांत सोनार ,भानुदास जगताप ,अश्विन जामगांवकर ,विजय गांधी ,प्रदीप पिपाडा ,रमेश लुणिया आदी उपस्थित होते .
यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून तेथील अडचणी काय काय आहेत या विषयी चर्चा केली तसेच येत्या सात जानेवारी रोजी या बाबत मीटिंगचे आयोजित केली असल्याचे सांगितले . यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते






